रायगड जिल्हा परिषद शाळा, बेडगाव च्या वतीने श्री राकेश आहिरे व श्री किशोर येवले आपले हार्दिक स्वागत करीत आहोत
Showing posts with label उपक्रम. Show all posts
Showing posts with label उपक्रम. Show all posts

Monday, 6 March 2017

आपल्या शाळेची Shala siddhi श्रेणी शोधा

आपल्या शाळेची शाळा सिध्दी श्रेणी काढण्यासाठी शाळा सिध्दी रिपोर्ट येथे क्लिक करा.

त्यात शाळेची माहिती व डोमेन चे स्तर इतकेच भरा आणि आपली श्रेणी जाणून घ्या. 

Saturday, 18 February 2017



                                                                                          छत्रपती शिवाजीराजे भोसले 

(१९ फेब्रुवारी १६३० ते ३ एप्रिल १६८०)
                हे इ.स. १८१८ पर्यंत टिकलेल्या आणि आपल्या परमोत्कर्षाच्या अवस्थेत भारतीय उपखंडाचा बराचसा भाग व्यापणार्‍या मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. भोसले कुळातील या सुपुत्राने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध ऐतिहासिक संघर्ष करून हिंदवी स्वराज्य स्थापन केले. रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजीने उभे केले आणि इ.स. १६७४ मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला. उत्कृष्ट योद्धा, आदर्श शासनकर्ता, प्रजाहितदक्ष कल्याणकारी राजा म्हणून जागतिक आणि विशेषत्वाने मराठी इतिहासात त्यांना अत्युच्च स्थान आहे.
महाराष्ट्रात, छत्रपती शिवाजी हे शिवाजीराजा, शिवाजीराजे, शिवबा, शिवबाराजे, शिव, शिवराय, शिवा अशा अनेक नावांनी ओळखले जातात. शिवाजीचा जन्मदिवस हा ’शिवजयंती’ म्हणून साजरा होतो. शिवाजी आणि त्यांचा पुत्र संभाजी यांचा संयुक्त उल्लेख शिवशंभू असा होतो. शिवाजीच्या कारकीर्दीला शिवकाल असेही म्हणतात.

Thursday, 26 January 2017


   भारताचा 68 वा प्रजासत्ताक दिन
मोठ्या उत्साहात रा जि प शाळा बेडगाव येथे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष,  विळे गावाच्या सरपंच तथा ग्रामस्थ मंडळी यांच्या उपस्थितीत साजरा झाला.    

Friday, 13 January 2017

बाल संस्कार शिबीर



   सालाबादप्रमाणे रायगड जिल्ह्यातील  भागाड केंद्राचे

सन २०१६-२०१७  या वर्षीचे बाल संस्कार शिबीर  
हे रायगड जिल्हा परिषद शाळा , बेडगाव येथे 
दि. १३/०१/२०१७ मोठ्या उत्साहात व मोठ्या संख्येने 
पार पडले. केंद्रातील सर्व शाळांनी तसेच विद्यार्थीनी 
त्या उपक्रमाचा आंनद लुटला. 
त्या उपक्रमाचे आयोजन करण्याची संधी 
आमच्या शाळेला मिळाली हे आमचे भाग्य समजतो.


 श्री किशोर येवले                   श्री राकेश आहिरे 
   मुख्याध्यापक                       उपशिक्षक 
   रायगड जिल्हा परिषद शाळा , बेडगाव
                                        
 मार्गदर्शक 
 श्री नितीन ओव्हाळ सर  
केंद्र भागाड