सुभाषचंद्र बोस (बंगाली: সুভাষ চন্দ্র বসু सुभाष चॉन्द्रो बॉसु) (जानेवारी २३, इ.स. १८९७ - ऑगस्ट १८, इ.स. १९४५?) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रेसर नेते होते.
हे नेताजी या नावाने ओळखले जातात. दुसरे महायुद्धसुरू असताना इंग्रजांशी लढण्यासाठी त्यांनी जपानच्यामदतीने आझाद हिंद फौज स्थापन केली होती. त्यांनी दिलेला जय हिन्द चा नारा हा आज भारताचा राष्ट्रीय नारा बनला आहे.
१९४४ मध्ये अमेरिकन पत्रकार लुई फिशर ह्यांच्याशी चर्चा करताना. महात्मा गांधींनी नेताजींचा देशभक्तांचा देशभक्तअसा उल्लेख केला होता.
नेताजींचे योगदान व प्रभाव इतका मोठा होता की काही जाणकार असे मानतात की जर त्यावेळी नेताजी भारतातउपस्थित असते तर कदाचित भारताची फाळणी न होताभारत एकसंध राष्ट्र म्हणून टिकून राहिला असता. स्वतःगांधींजी देखील असेच मानत होते.
No comments:
Post a Comment